death

ठाण्यातील मनोरंजन वाचनालयाच्या शैलजा बेडेकर यांचं निधन

ठाण्यातील मनोरंजन वाचनालयाच्या शैलजा बेडेकर यांचं काल रात्री वृध्दापकाळानं निधन झालं. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांनी एम ए मराठी केलं होतं. दिव्यांगांच्या मदतीसाठी त्यांनी स्वयंसिध्द ही संस्था सुरू केली होती. ग्रंथप्रेमी असलेल्या शैलजा बेडेकर यांनी ५० वर्षापूर्वी मनोरंजन वाचनालयाची स्थापना केली होती. स्वत: अपंग असतानाही त्या सार्वजनिक, सामाजिक तसंच सांस्कृतिक जीवनात सतत कार्यरत होत्या. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. विजय बेडेकर यांच्या त्या भगिनी होत्या.

Comment here