police

ठाण्यातील डान्सबार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाचे ४ अधिकारी-कर्मचा-यांना निलंबित

ठाण्यातील डान्सबार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या ४ अधिकारी-कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं आहे. दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीवरून नियत वेळेपेक्षा अधिक काळ चालणा-या तसंच परवानगी नसताना सुरू असणा-या डान्स बारचं प्रकरण उघडकीस आणलं होतं. यानंतर ठाण्यातील चार वरिष्ठ पोलीस अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला होता. त्याचवेळी पोलीसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क अधिका-यांवरही कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रसाद लाड यांनी केली होती. त्यानुसार आज उत्पादन शुल्क विभागाच्या ४ अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई झाली असून सब इन्स्पेक्टर बजरंग पाटील, प्रदीपकुमार सर्जिने, कॉन्स्टेबल जोतिबा पाटील आणि सुरेंद्र म्हस्के या चार जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

Comment here