नौपाडा-कोपरीमध्ये आज सर्वाधिक म्हणजे ९ रूग्ण

ठाण्यात आज ४७ नवे रूग्ण सापडले तर नौपाडा-कोपरीमध्ये आज सर्वाधिक म्हणजे ९ रूग्ण सापडले.

कोपरी पुलाच्या मधल्या दोन मार्गिकांचं काम येत्या ९ महिन्यात पूर्ण करण्याची रेल्वे आणि एमएमआरडीएची ग्वाही

ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि रेल्वेने दिल्यानंतर या पुलासाठी लागणारे गर्डर आणि बीम तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

ठाण्यातील डान्सबारप्रकरणी पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागावरही कारवाई करण्याची आमदार प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाण्यातील डान्सबार प्रकरणी केवळ पोलिसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क खात्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाच्या अधीक्षक आणि उपअधीक्षकांना याप्रकरणी निलंबित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी केली.

Read more

रेस्टॉरंट, बार पहाटेपर्यंत सुरू ठेवणं चार वरिष्ठ पोलीस अधिका-यांना भोवले

राज्यामध्ये तिस-या स्तराच्या निर्बंधांमुळे सर्व व्यवसाय ठराविक वेळेतच सुरू ठेवावे लागत असताना ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहिल्याचं प्रकरण ठाण्यातील चार वरिष्ठ अधिका-यांना भोवलं आहे.

Read more

अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ कारवाई करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मोक्कान्वये कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Read more

तब्बल १० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर वारक-यांना मिळाले हक्काचे वारकरी भवन

ठाण्यातील वारकरी भवनाचं अखेर १० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज लोकार्पण करण्यात आलं.

Read more

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती आणि विषय समिती सभापती पदासाठी बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती, आणि एक विषय समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजकल्याण समिती सभापती पदी प्रकाश तेलीवरे, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर आणि विषय समिती सभापती पदी वंदना भांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

रहिवाशांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी असून क्लस्टर प्रकल्प राबवताना अन्याय होऊ देणार नाही – संजय केळकर

क्लस्टर डेव्हलपमेंटचा क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्याची अंमलबजावणी जर नीट केली नाही तर क्लस्टरचे एस.आर.ए. होईल, ते होऊ देऊ नका असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी राबोडी येथील “जन की बात” या कार्यक्रमात केले.

Read more

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

मुंब्रा येथील लकी कंपाऊंडमध्ये झालेल्या दुर्घटनेतील अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या धर्तीवर घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more