TMC

महापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी शहरातील नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल भागांची आणि पडझड झालेल्या ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टीमुळे शहरातील पाणी साचण्याऱ्या ठिकाणी पंप लावणे, रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले.
आज शहरातील चिखलवाडी येथून नालेसफाई तसेच पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर महर्षी वाल्मीकी मार्ग, मायानगर कोपरी, पनामा सुपरमॅक्स कंपनी, आईमाता मंदिर चौक, महात्मा फुले नगर तसेच ज्ञानेश्वर नगर येथील नाल्याची पाहणी केली. पनामा येथील नाल्याच्या ठिकाणी महापौरांनी नाला रूंदीकरण करण्याची सूचना केली. चिखलवाडी येथे मुसळधार पावसात नेहमीच पाणी साचणे त्या ठिकाणी पंप लावण्यात आले असून इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी नागरिकांशी संवाद साधून येथील समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे शहरात रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणे, पाणी साठलेल्या ठिकाणी सबमर्सियल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या इतर उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले.

 

Comment here