TMC

महापालिका आयुक्त आणि महापौरांनी कोविड वॉर रूमला भेट देऊन घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

ठाणे महापालिका आयुक्त आणि महापौरांनी मनुष्यबळ तसंच यांत्रिक बाबीनं अधिक सक्षम करण्यात आलेल्या कोविड वॉर रूमला भेट देऊन संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. कोविड वॉर रूममधील सर्व दूरध्वनी क्रमांक एकाच क्रमांकानं जोडण्यात आले असून मनुष्यबळही वाढवण्यात आलं आहे. तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणखी मनुष्यबळ वाढवून कोविड वॉर रूम सुसज्ज ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. कोविड वॉररूमचा ७३०६३३०३३० हा क्रमांक स्वत: उपयोग करून तो सुरळीतपणे सुरू आहे की नाही याची आयुक्त आणि महापौरांनी खात्री करून घेतली. शहरातील उपलब्ध जवळचे रूग्णालय, उपलब्ध खाटा, अत्यावश्यक रूग्णवाहिका अशा विविध माहितीसाठी ७३०६३३०३३० या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महापालिका आयुक्त आणि महापौरांनी केलं आहे.

Comment here