railway

मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड येथे महिला टीमने केले मालवाहतूक ट्रेनचे सखोल परीक्षण

मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड येथे महिला टीमने मालवाहतूक ट्रेनचे सखोल परीक्षण केले. कोविड आव्हाने असूनही, पुरवठा साखळी चालू ठेवण्यासाठी रेल्वे आवश्यक वस्तू व इतर साहित्याची वाहतूक करीत आहे. मालवाहतूक करणा-या गाड्यांची काही ठराविक फे-यांनंतर नेमलेल्या ठिकाणी तपासणी केली जाते. मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनची 10 जणींच्या महिला टीमने कल्याण गुड्स यार्ड येथे सखोल तपासणी केली. अशा प्रकारचे काम करणारी ही पहिली महिला टीम आहे. स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणा-या अशा ४४ बीओएसटी प्रकारच्या रिक्त वॅगनच्या रॅकची तपासणी संपूर्ण महिला टीमने केली. गीअर तपासणी, एअर ब्रेक टेस्टिंग, अंडर फ्रेम्सची तपासणी, साइड पॅनेल्स आणि सदोष घटक आणि संबंधित दुरुस्तीसाठी संपूर्ण १० जणींच्या महिला टीमने हे कौतुकास्पद काम केले आहे. रेकची सखोल परीक्षा साडेचार तासात पूर्ण झाली आणि पुढच्या प्रवासासाठी रेक फिट केले गेले. या टीममध्ये अर्चना जाधव, ज्योती दामोदरे, अश्वनी पाटील, श्वेता सूर्यवंशी, प्रियांका खोलेकर, दिपाली, सुनीता, सविता, सुजाता आणि खुशबू या महिला होत्या.

Comment here