TMC

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडण्याचं पालिकेचं आवाहन

शहरात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येत्या तीन दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. कालपासून शहरात जोरदार पाऊस सुरू असून येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, पाऊस सुरु असताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी थांबावे, पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास विजेचे खांब आणि झाडाखाली उभे राहू नये तसेच आपली वाहने रस्त्यावर झाडाखाली उभी न करता सुरक्षित ठिकाणी पार्किग करावीत. या दरम्यान मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. पालिकेच्या वतीने मान्सून कालावधीत आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – १८०० २२२ १०८ व हेल्पलाईन – ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Comment here