जिल्ह्यात आज कोरोनामुळे ६५ जणांचा मृत्यू

एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असताना आज जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे ६५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रामध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

दोस्ती विहारमध्ये एकाच दिवशी ७३० रहिवाशांचे लसीकरण

खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने शहरांतील गृहसंकुलांमध्ये लसीकरण सुरू झाले असून वर्तकनगर येथील दोस्ती विहार सोसायटीत पहिल्याच दिवशी ७३० रहिवाशांचे विक्रमी लसीकरण करण्यात आले आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये आज सर्वाधिक ३३ नवे रूग्ण

ठाण्यात आज १०९ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये आज सर्वाधिक ३३ नवे रूग्ण सापडले.

ठाणेकरांना २७ एप्रिल २०२६ पर्यंत नावासह जन्म नोंदणीची संधी

शाळा-महाविद्यालयांत प्रवेश, नोकरी तसेच पासपोर्ट अशा सर्व महत्वाच्या कामी जन्मदाखला अत्यावश्यक असल्याने आता 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या नावासह जन्माची नोंद करुन 27 एप्रिल 2026 पर्यंत दाखला मिळविण्याची नवीन संधी मिळणार असून नागरिकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read more

महापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी शहरातील नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल भागांची आणि पडझड झालेल्या ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Read more

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडण्याचं पालिकेचं आवाहन

शहरात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येत्या तीन दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड येथे महिला टीमने केले मालवाहतूक ट्रेनचे सखोल परीक्षण

मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड येथे महिला टीमने मालवाहतूक ट्रेनचे सखोल परीक्षण केले.

Read more

महापालिका आयुक्त आणि महापौरांनी कोविड वॉर रूमला भेट देऊन घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

ठाणे महापालिका आयुक्त आणि महापौरांनी मनुष्यबळ तसंच यांत्रिक बाबीनं अधिक सक्षम करण्यात आलेल्या कोविड वॉर रूमला भेट देऊन संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला.

Read more

मुंब्रा आणि शिळ-दिव्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार

कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी ठेकेदारांनी कामे प्रलंबित ठेवल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा ठेकेदार, अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यांना समज देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी दिली.

Read more