MNSpolitical

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे स्थानकात वाढीव वीजबिल विरोधात स्वाक्षरी मोहीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे स्थानकात वाढीव वीजबिल विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारने अनेकदा आश्वासन देऊनही वीजबिल कपात केली नाही. दिवाळी नंतर वीजबिल भरणे सक्तीचे आहे असे जाहीर करून सर्वसामान्यांना महागाईचा “शॉक” दिला आहे. सरकारला नागरिकांचा आक्रोश निदर्शनास आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. सोमवार पर्यंत या वीजबिल कपातीवर निर्णय न झाल्यास हे आंदोलन आणखी उग्र करण्यांत येईल असा ईशारा शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला आहे.

Comment here