BJPpoliticalTMC

वेबिनारद्वारे होणारी महासभा रद्द करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ठिय्या आंदोलन

वेबिनारद्वारे होणारी महासभा रद्द करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कालच्या महासभेत समूह विकास योजनेतील काही आराखड्यांना मंजुरी देणं, सायकल स्टँडबाबतचा प्रस्ताव, मेट्रोच्या ठेकेदाराला विनामूल्य जागा देण्याचा विषय असे अनेक महत्वाचे विषय चर्चेला होते. या विषयावर चर्चा व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना पत्र देऊन ही सभा प्रत्यक्ष घेण्याची मागणी केली. पण तरीही सर्वसाधारण सभा सुरू झाली. त्यामुळं वेबिनार सभा रद्द करून प्रत्यक्ष सभा घेण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलन केलं. या सभेत मेट्रोच्या कामासाठी कोलशेत येथील जागा रेडी रेकनर दरानेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेली २ वर्ष प्राधिकरणाचा ठेकेदार विनामूल्य जागा वापरत असल्यानं दोन वर्षाचे भाडे वसूल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Comment here