politicalshivsena

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दहिसर-बाळे-वाकळण रस्त्यासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दहिसर – बाळे – वाकळण या अंतर्गत रस्त्यासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ अंर्तगत दहिसर – बाळे – वाकळण या गावांतर्गत रस्ता एकूण ४ कि.मी. चा आहे. या रस्त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास या योजनेंतर्गत या रस्त्याच्या निधीसाठी पाठपुरावा केला होता. कल्याण ग्रामीण जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या दहिसर – बाळे – वाकळण या गावांतर्गत रस्ता हा मुख्य रस्ता असून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, नागरिकांना प्रवास करण्यात आणि दळणवळणासाठी ही मोठी अडचण येत आहे, अनेक भागातील रस्ते उखडून गेल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत, तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि दळणवळणासाठी रस्ते हा विकासाचा एक नवा मार्ग असल्याने ग्रामीण भागाची नाळ पक्क्या रस्त्याना जोडली पाहिजे या अनुषंगाने हा रस्ता तातडीने तयार करण्यात यावा यासाठी शिंदे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर करून घेतला असून हा ४ किलोमीटरचा रस्ता असून याअंतर्गत दहिसर, नेवाळी, निघू, बाम्मली, वाकळण या गावांचा समावेश होतो; तसेच ४ किलोमीटर रस्त्यांपैकी १ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर करुन घेण्यात आला आहे. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी निधीची आवश्यकता असून हा निधी लवकरात लवकर मंजूर करून घेण्यात येईल अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

 

Comment here