corona

जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ३८८ कोरोना ग्रस्त

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ३८८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख १० हजार २३१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २२ हजार २०२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ४६१ रूग्ण उपचार घेत असून ४६ हजार ९६४ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार २५६ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार ८९ बरे झाले तर १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार २६६ रूग्ण असून ४४ हजार ५६८ बरे झाले तर ९५३ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ५२५ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ३१९ कोरोनातून बरे झाले तर ७५० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३३६ रूग्ण असून ९ हजार ८९६ बरे झाले तर ३५० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १४४ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ६६७ कोरोनातून बरे झाले तर ३४० जणं दगावले. अंबरनाथमध्ये १६८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार २३९ बरे झाले तर २८४ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ११९ रूग्ण असून ७ हजार ५४० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ११३ रूग्ण असून १६ हजार ११ बरे झाले तर ५५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comment here