collector

जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

ठाणे जिल्हयामध्ये १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. ज्यांच्या नावातील दुरुस्ती, कायमस्वरुपी स्थानात बदल, मयत मतदार असे अर्ज संबंधित विधानसभा मतदार संघांचे मध्यवर्ती कार्यालय, तहसिलदार कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील. दावे आणि हरकती स्विकारण्याचा कालावधी 15 डिसेंबरपर्यंत आहे. 14 जानेवारी 2021 पर्यंत प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे.डेटाबेसचे अदयावतीकरण आणि पुरवणी यादयांची छपाई असा असून 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करणे असा आहे. जिल्ह्यातील रहिवाश्यांनी १५ डिसेंबरपर्यंत फॉर्म नमुना भरणे. फॉर्म नमूना नं. 6- नव्याने मतदार नोंदणी करणे ,फॉर्म – नमूना नं. 7 मयत मतदार , कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणे, फॉर्म – नमूना नं. 8 – मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करणेकरिता ,फॉर्म नमूना नं. 8 अ – मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता भरणे आवश्यक आहे असं जिल्हाधिका-यांनी कळवलं आहे.

Comment here