collectorTraffic Police

कल्याण शहरात वाहतुक मार्गात बदल

कल्याण आणि कोळशेवाडी वाहतुक उप विभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडुन कल्याण शिळफाटा रोडवरील कल्याण पश्चिम आणि पुर्वेस जोडणारा जुना पत्री पुल निष्कासित करुन नविन लोखंडी पत्रीपुल बांधण्याचे कामकाज आणि नविन पत्रीपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी मोठी क्रेन पुलावर ठेवून काम करावे लागणार आहे. याकरिता सध्या एका पुलावरुन दोन्ही वाहीनीवरील सुरु असलेली वाहतुक २२ नोव्हेंबरपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. कल्याण-शिळ रोड मार्गे होणारी वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने आणि कल्याण शहर परिसरातील वाहतुक कोंडी होवू नये, वाहतुक सुरळीत होण्याकरीता, वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत असे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.
कल्याण शहरातुन शिळरोडवरील पत्रीपुल मार्गे वाहतुक करणाऱ्या जड,अवजड वाहनांना रांजनोली नाका येथे’प्रवेश बंद’ करण्यात येत असून ही वाहने रांजनोली नाका भिवंडी येथुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरुन खारेगांव टोलनाका- मुंब्रा बायपास मार्गे इच्छितस्थळी जातील.
कल्याण शहरातून शिळरोडवरीरल पत्रीपुल मार्गे वाहतुक करणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला असून ही वाहने दुर्गामाता चौक येथे डावीकडे वळण घेवून आधारवाडी चौक,खडकपाडा चौक -भवानी माता चौक, नेताजी सुभाष चौक,वालधुनी ब्रिज, सम्राटचौक शांतीनगर,जुना विठठलवाडी मार्गे, ॲब्रोसिया हॉटेल, पवई चौक,श्रीराम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
कल्याण-नगर राज्य महामार्ग क्रमांक २२२ वरुन शिळरेड वरील पत्रीपुल मार्गे वाहतुक करणाऱ्या वाहनांना नेताजी सुभाष चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत असून ही वाहने नेताजी चौक येथे डावे वळण घेवून वालधुनी शांतीनगर, जुना विठठलवाडी मार्गे, ॲब्रोसिया हॉटेल, पवई चौक.श्रीराम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
कल्याण-शिळफाटा रोडवरील कल्याण पश्चिम व पूर्वेस जोडणारा जुना पत्रीपुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुचक नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून बदलापुर आणि तळोजा कडुन खोणी मार्गे कल्याणकडे जाणारी जड-अवजड वाहने खोणी,तळोजा,कल्याण फाटा,शिळफाटा,मुंब्रा ,खारेगांव टोल नाका या मार्गाने इच्छित स्थळी जातील. तसंच कल्याण फाटया कडुन कल्याण पश्चिमेकडे जाणारी हलकी वाहने कल्याण पुर्वेकडील सुचक नाका येथुन उजवीकडे वळण घेवून इच्छित स्थळी जातील.

Comment here