TMC

वेतनश्रेणीतील त्रुटी दूर केल्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना महापौरांच्या प्रयत्नामुळे न्याय

अग्निशमन दलातील कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर केल्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना महापौरांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळाला आहे. अग्निशमन दलातील कर्मचा-यांना नॉन क्वॉलिफाईड ऑफिसर या पदासाठी नियमानुसार ४२०० रूपयांची वेतनश्रेणी असताना त्यांना २४०० रूपयांची वेतनश्रेणी मिळत होती. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कर्मचा-यांना देय असलेली श्रेणी लागू केली असून गेल्या ४ महिन्यांपासून या वेतनश्रेणीचा लाभ कर्मचा-यांना मिळू लागला आहे. या कर्मचा-यांनी महापौरांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

Comment here