crime

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं जप्त केला विदेशी मद्याचा ४ लाखांचा साठा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं शासनाचा महसुल बुडवून दादरा-नगर- हवेलीतून आणल्या जाणा-या परराज्यातील विदेशी मद्याचा ४ लाखांचा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या ठाणे विभागाला मुंबई-नाशिक महामार्गे येवई नाक्यावरून अवैधरित्या मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकानं पाळत ठेवली आणि तपासणी केली जात असताना एका टोयॅटो करोला गाडीतून बनावट मद्याचा साठा हस्तगत केला. याप्रकरणी या गाडीचा चालक सुनील पाटील याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या वाहनाची तपासणी करण्यात आली असता रॉयल स्टॅग व्हीस्की, मॅकडोनाल्ड आणि इम्पिरियल ब्लू व्हीस्कीच्या प्रत्येकी ७५० मिलीलीटरच्या प्रत्येकी १२० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. सुनिल पाटील याला याप्रकरणी अटक करण्यात आली असून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Comment here