मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा

यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक कारणांनी आगळी वेगळी ठरली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार हा केंद्रबिंदू मानून मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Read more

जिल्ह्यामध्ये सोमवारी होणा-या मतदानात ६२ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार

जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी मतदान होणार असून या मतदानात जिल्ह्यातील ६२ लाख २५ हजार १९४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघात संपूर्णत: महिलांनी नियंत्रित केलेली १५ सखी मतदान केंद्र तर दिव्यांगांनी नियंत्रित केलेली ५ सक्षम केंद्र

येत्या सोमवारी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात १५ सखी केंद्र तर ५ सक्षम केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.

Read more

ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदानाचा अधिकार बजवावा असा संदेश देणारी बाईक रॅली

राज्यामधील चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी होत असून संविधानानं दिलेल्या मताधिकाराद्वारे कार्यक्षम उमेदवाराची निवड करून लोकशाही बळकट करावी असा संदेश बाईक रायडर्सच्या माध्यमातून आज देण्यात आला.

Read more

मतदान आणि मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या तीन जागांसाठी येत्या सोमवारी मतदान होत असून हे मतदान निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read more

मतदान करण्यासाठी मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्र आवश्यक

जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या ३ मतदारसंघांसाठी येत्या सोमवारी मतदान होत असून मतदान करण्यासाठी मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्र आवश्यक असून ते नसल्यास इतर ११ दस्तऐवज ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत.

Read more

वाघबीळ गावात ५०० पोलीस घुसवून गावक-यांवर दहशत निर्माण केली जात असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांना रोखणा-या वाघबीळ ग्रामस्थांच्या विरोधात पोलीसी बळाचा वापर केला जात असून या गावात ५०० पोलीस घुसवून गावक-यांवर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Read more

मोदी सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं विविध सामाजिक पक्ष आणि संघटनांचं आवाहन

लोकशाहीची हत्या करणा-या मोदी सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार आनंद परांजपे यांना विजयी करा असं आवाहन ठाण्यातील सामाजिक आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एका पत्रकार परिषदेत केलं आहे.

Read more

समस्त ब्राह्मण समाजाचा पाठिंबा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवारांना

एकीकडे मराठा समाजानं ब्राह्मण उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असतानाच आता समस्त ब्राह्मण समाजानं मराठा असलेल्या राजन विचारे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Read more

आनंद परांजपे हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार – सुप्रिया सुळे

आनंद परांजपे यांना संसदेत काम करताना पाहिलं आहे. ते उच्चशिक्षित तर आहेतच पण सुसंस्कारीतही आहेत. शिक्षणातूनच प्रगल्भता आणि समानता आणता येते त्यामुळं या दोन्ही गुणांचा मेळ साधला जात असेल तर हा बोनस आनंद परांजपे यांच्या रूपाने ठाणेकरांना मिळणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read more