२२ लाखांचे परकीय चलन बाळगणा-या एका महिलेसह चौघांना अटक

मुंब्रा पोलीसांनी भारतीय चलनातील २२ लाखांचं परकीय बाळगणा-या चौघांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक ए. टी. बडे यांना काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात परकीय चलन स्वत:जवळ बेकायदेशीररित्या बाळगून परदेशात जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंब्र्यातील दत्तूवाडी पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून टोयॅटो इटोस गाडीतून आलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे हे परकीय चलन आढळून आलं. या परकीय चलनाबाबत त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं रफीक खान, अमजद खान, अब्दुल शेख आणि मुमताज शेख अशा चौघांना पोलीसांनी अटक केली. रफीक खानकडे साडेसात लाखांचे ४० हजार दिराम, अमजद खानकडे ८ लाख ४५ हजारांचे ४७ हजार दिराम, मुमताज शेखकडे ५ लाख ३२ हजारांचे ७ हजार ७०० डॉलर मिळाले. या परकीय चलनाबाबत कोणतीही उत्तरं त्यांनी दिली नाहीत. त्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे अनधिकृतपणे परकीय चलन बाळगण्याप्रकरणी पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading