२० पेक्षा जास्त तक्रारींना अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उद्यान विभागाचा तात्काळ प्रतिसाद

शहरातील स्टेशन परिसरात पडलेले जाहिरातीचे फलक, गोखले रस्त्यावर उन्मळून पडलेलं झाड, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन विभागाच्या वतीनं तात्काळ हटवण्याची कारवाई करण्याबरोबरच २० पेक्षा जास्त तक्रारींना अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उद्यान विभागानं तात्काळ प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत जिवितहानी होणार नाही यासाठी सर्व अधिका-यांनी दक्ष राहण्याचे कडक आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील प्राप्त होणा-या तक्रारींबाबत अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून तात्काळ प्रतिसाद दिला आहे. स्टेशन परिसरात पडलेले जाहिरातीचे फलक आणि गोखले रस्त्यावर उन्मळून पडलेलं झाड तात्काळ हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागास १ ऑक्टोबर २०१८ ते १२ जून २०१९ या कालावधीत धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी ४५७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३० अर्जांना प्राधिकरणानं परवानगी दिली असून धोकादायक झाडं, झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना आपल्या परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटायच्या आहेत त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागास अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व अधिका-यांना दक्ष राहण्याच्या कडक सूचना दिल्या असून ते स्वत:ही या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading