वाहतूक शाखेच्या पोलीसामुळे एक लाखांची रोकड असलेली गहाळ झालेली बॅग पुन्हा परत मिळाली

एरवी टीकेचे धनी ठरणा-या वाहतूक शाखेच्या पोलीसामुळे एक लाखांची रोकड असलेली गहाळ झालेली बॅग पुन्हा परत मिळू शकली आहे. ठाण्यातील आकाशगंगा परिसरात राहणा-या वसीम अन्सारी यांची एक लाखांची रोकड असणारी बॅग रस्त्यात गहाळ झाली होती. ही गहाळ झालेली बॅग राबोडी उपविभागात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कुमावत यांना मिळाली होती. कुमावत कालआकाशगंगा सोसायटी जवळून जात असताना त्यांना रस्त्यात एक काळ्या रंगाची बॅग मिळाली. कुमावत यांनी ही बॅग उचलून ती तपासली असता त्यांना बॅगेमध्ये एक लाखांची रोकड आढळली. त्यांनी बॅगेच्या मालकाचा पत्ता, नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो बॅगेत आढळला नाही. कुमावत यांनी बरेच प्रयत्न करून बॅगेचे मालक वसीम अन्सारी यांना शोधून काढलं. त्यांनी कुमावत यांच्याकडील बॅगेची ओळख पटवून त्यात १ लाखांची रोकड असल्याचंही सांगितलं. कुमावत यांची खात्री पटल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्यासमोरच वसीम अन्सारी यांना ही बॅग सुपूर्द करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading