मिसल्स रूबेला लस मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाची असून अफवांवर विश्वास ठेवू नये – पालिका आयुक्तांचं आवाहन

मिसल्स रूबेला लस ही मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाची असून पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलांच्या आरोग्याचा विचार करावा असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. कौसा येथे मुस्लिम धर्मगुरू, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक यांनी याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मिसल्स रूबेला लसीकरणाबाबत मुंब्रा आणि कौसामध्ये गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. या बैठकीस मोठ्या प्रमाणात पालक आणि शिक्षक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या लसीची गुणवत्ता सिध्द झाली असून देशात जवळपास २० कोटी विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे. आपले जर आपल्या मुलांवर प्रेम असेल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी असेल तर या लसीबाबत पसरवण्यात आलेले गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही पालिका आयुक्तांनी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading