महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी एका महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. डॉ. वैशाली इंगळे या डोळखांब येथील गुंडेगावामध्ये रूग्ण तपासत असताना अभिजित भोईर हा दोन रूग्णांना घेऊन आला. त्यांची तपासणी झाल्यानंतर जाताना त्यांनी डॉक्टरांकडे बघून काही खाणाखुणा केल्या. दुपारनंतर डॉ. वैशाली इंगळे या डोळखांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या असताना ३ अनोळखी व्यक्ती तिथे आल्या. त्यातील एकानं आपण शिवसेनेचा नेता असल्याची ओळख करून दिली आणि या व्यक्तीबरोबर असलेल्या दोघांनी रूग्णांचे केस पेपर का फाडले यावरून डॉ. इंगळे यांच्याबरोबर भांडण सुरू केलं. तसंच या दोघांनी डॉ. इंगळेंना  धक्काबुक्की करत मारहाण केली. इंगळे यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी अभिजित भोईर, भास्कर भोईर आणि यशवंत धांडव अशा तिघांना याप्रकरणी अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading