भाडेतत्वावर चालवण्याकरिता घेतलेली वाहनं परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणूक करणा-या टोळीस अटक

भाडेतत्वावर चालवण्याकरिता घेतलेली वाहनं परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणूक करणा-या टोळीस जेरबंद करण्यात कासारवडवली पोलीसांना यश आलं आहे. कोपरीत राहणा-या किशोर सुंभे यांना नरेश शेट्टी आणि भास्कर पवार या दोघांनी त्यांच्या दोन मारूती इर्टिगा गाड्या रोज ३ हजार रूपये भाडं देतो सांगून नेल्या. मात्र या गाड्यांची या दोघांनी परस्पर विक्री केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीसात तक्रार दाखल झाल्यानंतर कासारवडवली पोलीसांनी या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण हे दोघं लपून राहत होते. कासारवडवली पोलीसांच्या पथकानं नंतर या दोघांचा शोध घेऊन ब्रह्मांड सर्कल येथून सापळा रचून या दोघांना अटक केली. तसंच यातील एक आरोपी तारकेश्वर पांडे याला कारागृहातून ताब्यात घेण्यात आलं आणि अशाप्रकारचे गुन्हे कुठे केले आहेत का याची चौकशी पोलीसांनी केली. चौकशी दरम्यान या तिघांनी सुंभे यांच्याकडून दोन गाड्या भाड्यानं घेऊन ११ लाखांना विकल्याची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी या दोन गाड्यांचा शोध घेऊन त्या जप्त केल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading