बनावट दस्तऐवज देऊन महागडे मोबाईल फोन कर्जावर खरेदी करत बँक आणि ग्राहकांची लाखो रूपयांची फसवणूक

बनावट दस्तऐवज देऊन महागडे मोबाईल फोन कर्जावर खरेदी करत बँक आणि ग्राहकांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ फेब्रवारी ते ७ मार्च या कालावधीत घडला आहे. असा प्रकार करणा-या भामट्यांनी दुस-या व्यक्तीच्या आधारकार्डावरील छायाचित्रं बदलून बोगस कागदपत्रं बँकेला सादर करून ॲपलचे महागडे मोबाईल फोन कर्जाने घेतले होते. ठाण्यातील विवियाना मॉलमधील ॲपल स्टोअरमध्ये सिटी बँकेचे काऊंटर आहे. या ठिकाणी ॲपलचे महागडे फोन कर्जाने दिले जातात. त्यानुसार श्रीकांत वाघ, मोहित शर्मा आणि केतन पावशे या विरारमधील रहिवाशांनी नामदेव पानमंद, विश्वनाथ टक्के आणि राजेश नाई यांच्या आधारकार्डावरील छायाचित्रं बदलून तसंच बनावट बँक खाती उघडून त्याद्वारे तीन महागडे मोबाईल फोन खरेदी केले होते. मात्र मोबाईल खरेदी केल्यापासून या तिघांनी कर्जाचे हफ्ते भरले नव्हते. कर्जाची रक्कम साडेतीन लाखाच्या पुढे गेल्यावर बँकेनं कागदपत्रांची छाननी केली असता कागदपत्रं बोगस असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी सिटी बँकेनं तक्रार केल्यानंतर विरारच्या तीन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading