पालघर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड

पालघर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनं बाजी मारली असली तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे या निवडून आल्या आहेत. पालघर नगर परिषदेसाठी काल मतदान झालं. परिषदेत एकूण २८ जागा असून दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळं २६ जागांसाठी जवळपास ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज झालेल्या मतमोजणीत शिवसेनेनं १३, भारतीय जनता पक्षानं १२ तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडीनं ३ जागा जिंकल्या. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध निवडून आला. प्रत्यक्ष झालेल्या मतदानात बहुमत मिळूनही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उज्ज्वला काळे विजयी झाल्यामुळं शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला धक्का बसला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading