ठाण्यातील भावना मिश्रा यांना ब्युटीफूल आईज् या किताबानं दिल्लीत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत गौरवण्यात आलं आहे. वृंदावनमध्ये राहणा-या भावना मिश्रा यांना दोन मुली असून त्यांचं स्वत:चं बूटीक आहे. अखिल भारतीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेत देशभरातून ४३ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज आणि फोटो मागवण्यात आले होते. नंतर टेलिफोनिक मुलाखत घेण्यात आली. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांच्या विविध प्रकारच्या फे-या झाल्या. यातून अंतिम विजेत्याची निवड करण्यात आली. यामध्ये भावना मिश्रा यांची ब्युटीफूल आईज् या किताबासाठी निवड झाली.