ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्य भास्कर मुंडले यांचं काल निधन झालं.ते ठाण्यातील आपल्या मुलीच्या घरी राहत होते. ते ८८ वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात संघावरील बंदीमुळे ते १९ महिने मिसाबंदी होते. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचंही काम केलं होतं. राम जन्मभूमी आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी मृत्यूनंतर देहदानाची इच्छा व्यक्त केल्यानं त्यांचं पार्थिव छत्रपती शिवाजी रूग्णालयाकडे सोपवण्यात आलं.