जिल्ह्यात ठिकठिकाणी योगदिन उत्साहानं साजरा

पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. ठाण्यामध्येही विविध ठिकाणी योगदिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अधिकारी-कर्मचा-यांसह योगसाधना केली. ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयातर्फेही योगदिन साजरा करण्यात आला. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या अधिकारी कर्मचा-यांसमवेत योगदिन साजरा केला. विविध शाळांमध्येही आज योगदिन आयोजित करण्यात आला. ब्राह्मण विद्यालय, डॉ. बेडेकर विद्यामंदिर तसंच इतर विविध शाळांमध्ये हा योगदिन साजरा करण्यात आला. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही योगासनं करून योगदिन साजरा केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading