जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न दिल्यामुळं प्रकाश आंबेडकरांची सभा न झाल्याचा आरोप

जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न दिल्यामुळं बदलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि अससुद्दिन ओवेसी यांची सभा होऊ शकली नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. अरूण सावंत यांच्या प्रचारासाठी बदलापूर येथे सभा होणार होती. सभेची वेळ १२ वाजताची होती पण २ वाजले तरी हे दोन्ही नेते न पोहचल्याने अखेर सभा गुंडाळण्यात आली. जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न दिल्यामुळं ही सभा रद्द करावी लागली असा आरोप वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. अरूण सावंत यांनी केला. बदलापूरमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी देता आली नाही असं जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading