जागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगांच्या संघाला संजय केळकर यांनी दिल्या शुभेच्छा

जागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगांच्या संघाला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इग्लंडमध्ये होत असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. दिवंगत माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विवियाना मॉलमध्ये दिव्यांगांचा भारतीय संघ उपस्थित होता. त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांतर्फे शुभेच्छा देऊन संघाचं कौतुक केलं. अजित वाडेकर यांच्या कन्या काश्मिरा वाडेकर याही यावेळी उपस्थित होत्या. दिव्यांगांच्या भारतीय संघात काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंतचे अनेक राज्यातील दिव्यांग खेळाडू असून त्यांचा ही जागतिक स्पर्धा जिंकण्याचा निर्धार आहे. या स्पर्धेसाठी हा संघ पुढील महिन्यात इंग्लंडला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading