जवाहरबाग येथील अत्याधुनिक स्मशानभूमी २६ जानेवारीपासून कार्यान्वित करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

जवाहरबाग येथे उभारण्यात येत असलेली अत्याधुनिक स्मशानभूमी २६ जानेवारी रोजी कार्यान्वित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या स्मशानभूमीची पाहणी करून स्मशानभूमीशी निगडीत कामं युध्द पातळीवर करण्याचे आदेश दिले. जवाहरबाग येथील जुन्या स्मशानभूमीच्या बाजूला अत्याधुनिक स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रसिध्द वास्तु विशारद प्रवीण जाधव यांनी या स्मशानभूमीचं आलेखन केलं आहे. या स्मशानभूमीची मुलभूत कामं पूर्ण झाली असून स्मशानभूमी समोरील चौकाचे सुशोभिकरण, चौकामधील आजूबाजूच्या महापालिकेच्या इमारतींची रंगसंगती स्मशानभूमीच्या रंगसंगतीशी सुसंगत करणं, राघोबा शंकर रस्त्यावरील स्मशानभूमी समोरील रस्त्याचं बांधकाम करणं, या रस्त्यामध्ये येणा-या २७ कुटुंबांचं पुनर्वसन करणं, महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देणं, स्मशानभूमीच्या चौकामध्ये हायमास्ट बसवणे अशा अनेक सूचना पालिका आयुक्तांनी यावेळी केल्या. स्मशानभूमीच्या आवारात आकर्षक लँडस्केपिंग करणं, आवारात विद्युत व्यवस्था उभारणं, ध्वनीक्षेपण यंत्रणा लावणं अशी कामं करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading