गृहरक्षक दलासाठी होणारी सदस्य नोंदणी अचानक रद्द करण्यात आल्यामुळं संतप्त झालेल्या उमेदवारांनी साकेत येथे रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला. जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या गृहरक्षक दलासाठी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पोलीस कवायत मैदान येथे होणार होता. मात्र पावसामुळे पोलीस कवायत मैदानात चिखल झाला आहे. त्यामुळं गोळाफेक, धावणे या चाचण्या घेणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र याची कल्पना नसल्यामुळं सदस्य नोंदणीसाठी आलेल्या उमेदवारांनी रास्ता रोको केला. काही वेळानंतर या सर्व उमेदवारांना साकेत मैदानाची परिस्थिती सांगण्यात आली आणि आता ही सदस्य नोंदणी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यात पुन्हा आयोजित केली जाईल असं सांगण्यात आलं.