कशेळीमध्ये अंतराळ विषयक माहितीचे आणि व्यवसाय मार्गदर्शनावर एका शिबीराचं आयोजन

कशेळीमध्ये अंतराळ विषयक माहितीचे आणि व्यवसाय मार्गदर्शनावर नासातील शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या एका शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. कशेळीतील कुणाल भोकरे, सर्वेश तरे आदी युवकांनी आपल्या समाजातील युवकांना शहरी भागातील युवकांप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळत नाही यासाठी भिवंडीतील कशेळी गावात या शिबीराचं आयोजन केलं होतं. या शिबीराला नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील, प्रज्ञेश म्हात्रे, हर्षवर्धन देशपांडे, रिंकेश कुरकुरे आणि सुगम ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. प्रणित पाटील सध्या नासाच्या प्रोजेक्ट पोसम ॲस्ट्रॉनॉट पदाचे कॅन्डीडेट आहेत. गणपतीसाठी ते गावात आले असताना त्यांनी या शिबीरासाठी वेळ दिला. या शिबीरात त्यांनी अंतराळातील ब-याच मोहिमांबद्दल माहिती दिली. नासात करिअर करण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आगरी-कोळी संस्कृती ही खारेपाटातील म्हणजे खाडीजवळील संस्कृती आहे. आपल्या जेवणात मीठाचं प्रमाण जास्त असल्यानं आपल्यात आयोडीनचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळं आपली बुध्दी तल्लख असल्यानं ती समाज आणि माणुसकीसाठी खर्च करा असं सांगितलं. आपल्या मुलींना शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते. त्यांना लग्नाच्या बंधनात अडकण्याची जबरदस्ती न करता शिकू द्या असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. या शिबीराच्या समारोप पर्वात उपस्थिताना तारे पाहण्याचा अनुभव मिळाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading