कल्याण लोकसभा अंतर्गत निवडणूक आचारसंहिता भरारी पथकानं उल्हासनगरमधील शांतीनगर नाक्यावर एका गाडीतून ७१ लाखांची रोकड जप्त केली आहे. उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी युवराज भदाणे यांच्या नेतृत्वाखाली शांतीनगर नाक्यावरून जाणा-या गाड्यांची तपासणी केली जात असताना त्यांना एका गाडीमध्ये ७१ लाखांची रोकड आढळली. या ७१ लाखांच्या रोकडीबाबत कारचालक रामदास पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळं रामदास पवार सह चंद्रकांत पाटील, सोनम कुंभार आणि योगेश जगताप यांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं.