आधारवाडी कारागृहात कैद्यानं कारागृह अधिक्षकांच्या केबिनची फोडली काच

आधारवाडी कारागृहात कच्चा कैदी असलेल्या नारायण रेड्डी यानं कारागृह अधिक्षकांच्या केबिनची काच फोडली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नारायण रेड्डी याला आधारवाडी कारागृहातून तळोजा कारागृहात हलवलं जाणार होतं. यामुळं संतप्त झालेल्या रेड्डीनं त्याला गाडीत नेलं जात असताना मध्येच पळून जाऊन कारागृह अधिक्षकांच्या केबिनची काच फोडली. यामुळं जखमी झालेल्या रेड्डीला उपचारानंतर तळोजा कारागृहात हलवण्यात आलं. लैंगिक अत्याचार प्रकरणात महिनाभरापूर्वीच त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात झाली होती. आधारवाडी कारागृहातही काही विशेष सवलती मिळाव्यात अशी त्याची मागणी होती. पण ही मागणी नाकारण्यात आल्यानंतर रेड्डी कारागृहातील कर्मचा-यांबरोबर अयोग्य वर्तणूक करत कारागृहाच्या झाडावर चढून बसला होता. त्याच्या या वर्तणुकीनंतरच त्याला ठाणे किंवा तळोजा कारागृहात हलवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading