TMC

स्थायी समितीवरील नवीन सदस्यांच्या निवडीवरून वाद रंगण्याची शक्यता

ठाणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची मदत न घेता स्थायी समिती आपल्याकडे राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. काल झालेल्या बैठकीत स्थायी समितीसाठी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. काल सर्वसाधारण सभेचे अधिकार वापरून स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे ८, काँग्रेसचा १ असे ९ सदस्य तर राष्ट्रवादीचे ३, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण असे आघाडीचे ४ सदस्य तर भारतीय जनता पक्षाचे ३ अशी १६ सदस्यांची निवड करण्यात आली. शिवसेनेने आपले जुनेच सदस्य कायम ठेवले आहेत तर भारतीय जनता पक्षाचे भरत चव्हाण, कृष्णा पाटील आणि नम्रता कोळी यांची स्थायी समितीवर वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं नजीब मुल्ला यांच्याऐवजी हणमंत जगदाळे यांची वर्णी स्थायी समितीवर लावली आहे. मात्र स्थायी समितीवर निवड झालेल्या सदस्यांमध्ये पक्षीय बलाबल पाहिलं गेलं नसल्याचं दिसत असून यामुळे पुन्हा एकदा त्यावरून न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे.

Comment here