Education

सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रास ए प्लस नामांकन

सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रास ए प्लस नामांकन मिळालं आहे. या अभ्यासकेंद्रात समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, इंग्रजी, हिंदी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र मराठी आणि इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम सुरू आहेत. सर्व दहावी-बारावी नापास विद्यार्थी आणि इतर शिक्षण घेण्याची इच्छा असणा-यांसाठी पदवीधर व्हा या नव्या उमेदीनं हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरण कायद्यान्वये या विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्ये झाली असून मुंबई विभागीय केंद्र, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय अभ्यासकेंद्रास हे मानांकन विद्यापीठानं प्रदान केलं आहे.

Comment here