सक्षम 2023 अतंर्गत 24 एप्रिल ते 8 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

पर्यावरण संरक्षण, ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी तसेच पेट्रोलियम उत्पादनाच्या संवर्धन जनजागृतीसाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या वतीने  24 एप्रिल ते 8 मे या कालावधीत सक्षम 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत ऊर्जा संरक्षण आणि पेट्रोलियम उत्पादनाच्या संवर्धनासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

            पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या वतीने सक्षम 2023 अतंर्गत राज्यस्तरीय कार्यक्रम 24 एप्रिल रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

            केंद्र शासनाने संरक्षण क्षमता महोत्सव अर्थात सक्षम 2023 हा कार्यक्रम सुरू केला असून यावर्षी ‘नेट झिरोच्या दिशेने ऊर्जा संरक्षण’ हे घोषवाक्य घेऊन जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या कालावधीत एक हजारापेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम वाहनचालविण्याची स्पर्धा आदींचा समावेश आहे. इंधन आणि तेल संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरवही करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading