politicalshivsena

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पांडुरंग बरोरा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. आज पांडुरंग बरोरा यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी आमदार पांडुरंग बरोरा यांनी कालच आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सादर केला होता. आज उध्दव ठाकरे यांनी पांडुरंग बरोरा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. आमदार बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जात होते.

Comment here