TMC

शहरामध्ये उद्याची पाणी कपात रद्द आता शुक्रवारपासून पुढील २४ तास पाणी पुरवठा बंद

ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणामार्फत उद्या होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी १७ मे सकाळी ९ पासून १८ मे सकाळी ९ पर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या दिवशी स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मीरा-भाईंदरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी आणि ठाणे महापालिकेची मुख्य जलवाहिनी साकेत येथे एकत्र करण्यात आली आहे. या ठिकाणी गळती होत असल्यामुळं दुरूस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. यासाठी शुक्रवार-शनिवार २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Comment here