विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयातर्फे ७ दिवसांची विशेष व्याख्यानमाला

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाने ७ दिवसांची विशेष व्याख्यानमाला आयोजित केली होती. डॉ. श्रीविद्या जयकुमार आणि प्रा. हेतल मेशेरी यांनी 11 एप्रिल रोजी ‘महिला आणि मुलांसाठी कल्याणकारी कायदे’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान घेतले. भारतीय संसदेने, विधानसभेने, न्यायालयाने वेळोवेळी स्त्रीया आणि बालकासांठी तयार केलेल्या विविध तरतुदी आणि न्यायनिर्णयाची चर्चा करण्यात आली. महीलानी वकीली क्षेत्रामध्ये किंवा न्यायव्यवस्थेमध्ये येण्यासाठी काय प्रयत्न केले पाहीजे याचेही मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. 12 एप्रिल रोजी डॉ. महेश बर्वे यांचे “मेडिको-लीगल क्षेत्रातील सराव आणि करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान झाले. वेगाने विकसित होणा-या या कायद्याच्या क्षेत्रात खुप काम आहे आणि यासाठी तरुण वकीलानी याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. आजच्या परिस्थितीमध्ये अनेकदा डॉक्टर किंवा इस्पितळाद्वारे आणि विरोधात दावे वाढत चालले आहेत अशा वेळेस कायद्याच्या या क्षेत्रात अभ्यास करणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन बर्वे यांनी केले.
13 एप्रिल रोजी, अॅड. अनंत गद्रे यांनी “बँकिंग कायदा आणि करिअरच्या संधी” या विषयावर संबोधित केले. बॅंकीग क्षेत्रात विधीच्या विद्यार्थ्याना खुप मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक बॅंकेत, आर्थिक संघटनेत वकीलाची गरज असते, रोज हजारो दावे तयार होत असुन ते चालविणारे तज्ञ वकील बॅंकेस हवे असतात. विद्यार्थ्यानी या क्षेत्रात वकीली केल्यास चांगली भरभराटी होवु शकेल.
15 एप्रिल रोजी रश्मी महाजन नाटेकर आणि समता जोशी यांचे ‘IPR: सराव आणि करिअरच्या संधींची व्याप्ती’ या विषयावर व्याख्यान झाले. आयपीआर मध्ये काम करणा-या अनेक लिगल फर्म असुन तिथे विद्यार्थ्याना असलेल्या संधी विषयी चर्चा करण्यात आली. शिवाय विदेशामध्ये असलेल्या संधीची ही चर्चा करण्यात आली. १८ एप्रिल रोजी ‘विम्याचा कायदा: सरावाची व्याप्ती आणि करिअरच्या संधी’ बोलताना अॅड. बलदेव राजपूत यांनी विमा ही आज प्रत्येक नागरीकांची गरज झाली असल्यामुळे प्रत्येक विमाधारक हा संभावित अशील होवु शकतो. विम्याशी संबधित अनेक दावे असतात, यामध्ये विद्यार्थी चांगल्याप्रकारे वकीली व्यवसाय करु शकतो असे त्यांनी सांगितले.
१९ एप्रिल रोजी दिवाणी आणि फौजदारी खटल्यातील पुरावा कायद्याचा वापर’ यावर बोलताना अॅड. सुनील परांजपे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना पुरावा कायदा कसा अभ्यासावा याबद्दल सांगितले. कायद्याचे कोणत्याही क्षेत्रात पुरावा कायदा कसे महत्वाचे काम करतो यावर त्यांनी मार्गदर्शन केले. २० एप्रिल रोजी,’लवाद कायदा: सराव आणि करिअरच्या संधींची व्याप्ती’ या विषयावर अॅड. आशिष गोगटे यांनी मार्गदर्शन केले. पांरपारीक न्यायालयीन पध्दतीच्या बाहेर जावुन लवादाद्वारे कशाप्रकारे दावे, वाद मिटविता येवु शकतात आणि यामध्ये किती संधी आहे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तृतीय विधीच्या विद्यार्थ्यासाठी या सात दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading