generalTMC

विटावा पूलाखालून कालपासून वाहतूक सुरू

विटावा पूलाखालून कालपासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. विटावा पूलाखाली खड्डे झाल्यामुळे विटावा पूलाची दुरूस्ती हाती घेण्यात आली होती. त्यामुळे सहा दिवस या रस्त्यावरील वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं होतं. विटावा रेल्वे पूलाखाली पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचून रस्त्याला खड्डे पडतात. यामुळं रस्ता खराब होतो आणि त्यामुळं मोठी वाहतूक कोंडीही होते. रस्त्यावर खड्डे पडू नये यासाठी आता या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं आहे. या दुरूस्तीच्या कामादरम्यान वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना बसला आहे. मात्र कालपासून ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळं वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Comment here