crime

वन्य जीव प्राण्यांच्या कातड्यांची आणि दाताची तस्करी करणा-यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं केलं जेरबंद

वन्य जीव प्राण्यांच्या कातड्यांची आणि दाताची तस्करी करणा-यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केलं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांना एक व्यक्ती बाळकूम-माजिवडा रस्त्यावर वाघ, बिबट्या, मगर आणि हत्ती यांची कातडी आणि दात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून समीर जाधव याला पकडण्यात आलं. त्याच्या चौकशीत त्याच्याकडील वाघाचे, बिबट्याचे आणि मगरीचे कातडे आणि हत्तीचे दोन दात असा ४५ लाख रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी समीर जाधवला अटक करण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Comment here