environment

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा हवामान तज्ञांचा अंदाज

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील ब-याच भागातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील तर अकोला, नागपूर, वर्धा जिल्ह्यातील तापमान ४६ अंशापर्यंत तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातीलही तापमान उद्यापासून ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानापासून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं असून योग्य प्रमाणात पाणी पिणं आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर त्वरीत उपचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Comment here