येऊर वनक्षेत्र हद्दीत आज पहाटेच्या दरम्यान एका बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

येऊर वनक्षेत्र हद्दीत आज पहाटेच्या दरम्यान एका बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. आज पहाटेच्या दरम्यान नागला परिमंडळमधील सारजामोरी वनहद्दीलगत जाणा-या दिवा वसई रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेने बिबट्या नराचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला असल्याचं रेल्वेच्या गँगमनने कळवले. तात्काळ वन अधिकारी-कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बिबट्याची नखे आणि दात तसंच इतर अवयव सुस्थितीत आढळून आले. मात्र बिबट्याचा मोठा अपघात झाल्यानं या बिबट्याचे पाय तुटले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं दिसून आलं. नंतर त्याला शवविच्छेदनासाठी बोरीवलीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. हा नर बिबट्या अंदाजे ३ ते वर्षाचा होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading