general

येऊरच्या जंगलातील प्राणी गणनेत दीडशेहून अधिक प्राण्यांची गणना

बुध्द पौर्णिमेला येऊरच्या जंगलात झालेल्या प्राणी गणनेत दीडशेहून अधिक पशु-पक्ष्यांची नोंद झाली आहे. बुध्द पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात प्राण्यांची शीरगणती केली जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील येऊरच्या जंगलातील १३ पाणवठ्यांसमोर मचाणं बांधण्यात आली होती. त्यावर बसलेल्या स्वयंसेवकांनी प्राणी आणि पक्ष्यांची गणना केली. या गणनेत एकच बिबट्या दिसला आहे. या जनगणनेमध्ये जंगली मांजर, सांबर, हरीण, माकड, मुंगूस, घुबड, वटवाघूळ अशा जवळपास १५७ प्राण्यांचं दर्शन झालं.

Comment here