TMC

पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तास बंद

ठाणे शहराचा आज बंद राहणारा पाणी पुरवठा आता शुक्रवारपासून पुढील २४ तास बंद राहणार आहे. आजची पाणी कपात रद्द करण्यात आली असून शुक्रवार म्हणजे १४ जूनला सकाळी ९ पासून १५ जूनला सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाला मुख्य जलवाहिनीवर दुरूस्ती करायची असल्यामुळं हा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पुढील २४ तास बंद राहणार आहे. यामुळं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याचा काही भाग, आझादनगर आणि डोंगरीपाडा या भागाचा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

Comment here