accident

नितीन कंपनी नाक्यावर सिग्नलचा एक खांब कोसळला – कोणतीही जिवितहानी नाही

नितीन कंपनी नाक्यावर सिग्नलचा एक खांब कोसळला. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. काल संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. नितीन कंपनी नाक्यावर असलेल्या या सिग्नलला एक वायर लटकली होती. ही वायर टीएमटी बसच्या छताला अडकली. बसच्या चालकाच्या हे लक्षात आलं नाही. तो गाडी घेऊन पुढे गेला. पण गंजलेला हा सिग्नल कमजोर झाला होता. त्यामुळं गाडी पुढे गेल्यावर खांब ओढला जाऊन तो रस्त्यावर पडला. सुदैवानं यावेळी सिग्नलला कोणीही उभं नव्हतं. त्यामुळं कोणताही अनर्थ टळला.

Comment here