railway

डोंबिवली रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रम

रेल्वे परिसर स्वच्छ राहण्याकरिता प्रवाशांनी रेल्वे परिसर स्वच्छ ठेवावा याकरिता रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे बोर्ड सदस्य, लोहमार्ग पोलीस, आरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमानं डोंबिवली रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ रेल्वे- सुंदर रेल्वे, थुंकू नका-थुंकू देऊ नका अशी उद्घोषणा करत डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती करून प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन थुंकू नका आणि थुंकू देऊ नका अशी शपथ देण्यात आली. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वरून जनजागृती रॅलीला सुरूवात करून फलाट क्रमांक ४ वरून जात जे प्रवासी फलाटावर पानगुटखा खाऊन थुंकत होते त्यांना गुलाबपुष्प देऊन रेल्वे परिसरात थुंकू नका अशी शपथ देण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, लोहमार्ग पोलीस, आरपीएफ कर्मचारी, स्टेशनवरील स्वच्छता करणारे कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ६ मे पासून स्वच्छता जनजागृती अभियानास ठाणे रेल्वे स्थानकातून सुरूवात करण्यात आली असून प्रवाशांची गर्दी होणा-या सर्व रेल्वे स्थानकांवर स्वच्छता जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे.

Comment here