Social

ठाण्यामध्ये ठिकठिकाणच्या रस्त्यांवर १ हजाराहून अधिक खड्डे

ठाण्यामध्ये ठिकठिकाणच्या रस्त्यांवर १ हजाराहून अधिक खड्डे पडले आहेत. ठाणे महापालिकेनं ९ प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. जून महिन्यात पावसानं जरी दडी मारली असली तरी जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं तीन हात नाका, नितीन कंपनी, विविध उड्डाणपूल आणि शहराच्या विविध भागात रस्त्यांना खड्डे पडल्याचं दिसत आहे. ठाण्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३५ खड्डे माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत रस्त्यांवर पडले आहेत. वागळे इस्टेट मध्ये २५६ तर दिव्यामध्ये ११८ ठिकाणी खड्डे पडले आहेत. पालिकेनं एकूण ११२२ खड्ड्यांपैकी ७२३ खड्डे भरले आहेत.

Comment here